motomagindia images

Discover Best motomagindia Images of World

#food #travel #sports #news #may #friday

#Repost @carbhar1 • • • • • • सुमारे दोन वर्षापासुन प्रतिक्षेत असलेल्या मारुती सुझुकी जिमी चे येत्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. जिमी ही सेमी ऑफ-रोड प्रकारची कार असून मागील वर्षी पासून जापान मध्ये तिची विक्री सुरू आहे. सदर मॉडेल ला जापानमध्ये भरभरून प्रतिसाद मिळत आहे. इंजिन - 1248 cc (पेट्रोल) 74 बीएचपी @ 4000 आरपीएम टोर्क - 190 एनएम @ 2000 आरपीएम अधिकतम गति (KMPH) 135 जमिनीपासून उंची - 190.00 mm वजन - 1155.00 kg इंधन टाकी क्षमता - 40.00 litres छायाचित्र - सुझुकी मोटर्स #marutisuzuki #jimny #suzukijimny #cars #carsofinstagram #india #motomagindia #CarBhar

9/25/2020, 12:20:25 PM

#Repost @carbhar1 • • • • • 1885: जगातील सर्वात पहिली मोटरसायकल जिचे नाव आहे डॅमलर रीटगेन (Daimler Reitwagen) पेट्रोल वापरून चालवली गेलेली ही मोटरसायकल जर्मनीमध्ये बनविण्यात आली होती. छायाचित्र सौजन्य : Wired.com #motorcycle #bike #Daimler #bikesofinstagram #love #auto #petrol #gears #motor #mumbai #pune #kolhapur #satara #ahmednagar #aurangabad #motomagindia #CarBhar

9/25/2020, 12:17:32 PM

मारुती सुझुकीने शुक्रवारी सीएनजीमध्ये अर्टिगाची बीएस 6 (Bharat Stage 6) आवृत्ती बाजारात आणली, जिची किंमत ₹ 8.95 लाख (एक्स-शोरूम नवी दिल्ली) ईतकी ठेवली आहे. 28.6 किमी / किलोग्रामचे मायलेज देणारी अर्टिगा "एस-सीएनजी" सध्या भारतात बसलेली सीएनजीयुक्त एकमेव एमपीव्ही असल्याचे कंपनीने म्हटले आहे. @carbhar #cargram #carsofinstagram #car #india #motomagindia #luxurycar #cars #indiancars #carsofindia #automobile #mpv #marutisuzuki #ertiga #marutisuzukiertiga #carlovers #autoexpo2020 #maruti #carlifestyle #carblog #carnews #carmagazine #CarBhar

2/8/2020, 5:23:26 AM

रशियन लक्झरी कार ऑरस सिनॅट फोलो करा @carbhar #cargram #carsofinstagram #car #india #motomagindia #luxurycar @ #carlifestyle #aurus #aurussenat #rollsroyce #Russia #russiancar #carblog #carlove #carspotting #futurecars #futureishere #carsofindia #carmagazine

2/6/2020, 5:46:44 PM

किया सेल्टोस एक्स लाईन (Kia Seltos X-line) @kiamotorsin Pc @drivespark . . #kia #kiaseltos #cars #india #motomagindia #CarBhar #carsofinstagram #futurecars #car #indiancars #automobile #indiascar #india #carblog #carnews #carwar #xline #kiacarnival #seltosxline #carlifestyle #carlove #carspotting #autoexpo2020 #CarBhar

2/6/2020, 11:19:46 AM

ऑटो एक्सपो 2020 मध्ये टाटा सिएरा एसयूव्ही प्रदर्शित झाली आहे. ईव्ही असलेली सिएरा एका संपूर्ण चार्जमध्ये सुमारे 400 किलोमीटरचे अंतर पार करु शकेल असा कंपनीचा दावा आहे; तत्पूर्वी ( सिएरा ईव्हीपूर्वी) मॉडेल पेट्रोल आणि डिझेल आवृत्तीत लाँच होऊ शकते. 2021 पर्यंत टाटा नवीन सिएरा एसयूव्ही बाजारात आणण्याची शक्यता आहे. #ev #suv #tatasierra #electriccar #future #futurecars #india #autoexpo2020 #autoexpo #car #carsofinstagram #cars #tataharrier #tatasafari #carnews #automobile #indianauto #supercar #carlifestyle #motomagindia #Carbhar

2/6/2020, 9:27:36 AM

मर्सिडिजच्या जी वॅगन वरून प्रेरित असलेल्या अस्सल भारतीय ऑफरोड अर्थातच फोर्स गुरखा बद्दल जाणून घेऊयात. 2008 साली लाँच झालेल्या फोर्स गुरखाला महिंद्रा थार ईतका प्रतिसाद मिळाला नसला तरी गुरखाने निश्चितच एसयूव्ही श्रेणीत आपले वेगळे स्थान निर्माण करून ते कायम राखून ठेवले आहे. एक्सट्रीम, एक्सप्लोरर, आणि एक्सपीडिशन अश्या तीन वेरिएंट मध्ये गुरखा उपलब्ध आहे. एक्सपीडिशन आणि एक्सप्लोरर व्हेरिएंटमध्ये 2.6-लिटर (2596 सीसी) इंजिन दिले गेले आहे जे 85PS पॉवर आणि 230Nm टॉर्क उत्पन्न करते, दुसरीकडे एक्सट्रीम व्हेरिएंटमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे जे 140PS पॉवर आणि 321Nm टॉर्क उत्पन्न करते. दोन्ही इंजिन 5 मॅनुअल गिअर्स सह 4WD (4 व्हील ड्राईव) येतात. अग्रेसिव लूक आणि तितकीच दणकट असलेली गुरखा ऑफ-रोडिंगसाठी एक सुसज्ज एसयूव्ही आहे असे आम्हाला वाटते. प्रारंभिक किंमत आहे 9.75 लाख रुपये (एक्स शोरूम) #carwar #offroad #indianauto #suv # #force #forcegurkha #gurkha #4x4 #jeep #thar #carsofinstagram #carlifestyle #forcemotors #jeeplove #mahindrathar #india #motomagindia #CarBhar

2/5/2020, 9:32:23 AM

खास भारतीय बाजारासाठी बनवलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही स्कोडा "विजन ईन" यावर्षी (वर्ष अखेरीस) लाँच होईल. येत्या काही दिवसांत या कारचे प्रॉडक्शन सुरू होईल. पाहता क्षणी लक्षात येईल की विजन ईनला पुढील बाजूस विस्तृत/मोठे बोनट आहे, ग्रिल सुद्धा रुंद आहे, पुढील आणि मागील खालील बाजूस स्पोर्टी गार्ड समाविष्ट करण्यात आले आहे. हेडलँम्पस आणि टेललँम्पससुद्धा अत्याधुनिक आहेत. अॅलोय व्हील आपण पाहू शकतो, तेही विशिष्ट पद्धतीने डिझाईन केले गेले आहेत. खासकरून टेललँम्प क्रिस्टल एलईडी प्रकारचे बसविण्यात आले असून केबीनमध्ये मोठे सनरूफ, 3 स्पोक स्टिअरिंग ज्यात फोन कंट्रोल आणि म्युझिक सिस्टीम कंट्रोल बटणे फिट असतील. स्कोडा व्हिजन ईन बहुधा 2 इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होईल, 1 लिटर 3 सिलेंडर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटर, 4 सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिनचा तिच्यात समावेश असेल. स्कोडा या मिडसाईज एसयूव्हीला डिझेल इंजिन पर्यायामधून वगळणार आहे, परंतु सीएनजी प्रकार ती उपलब्ध असू शकेल. भारतीय बाजारात हुंडाई क्रेटा, किया सेल्टोस, एमजी हेक्टर आणि टाटा हॅरियर यांच्याशी विजन ईन स्पर्धा करेल. प्रारंभिक किंमत असेल सुमारे 10 लाख रुपये (एक्स शोरूम) #skoda #skodavisionin #cars #india #motomagindia #CarBhar #carsofinstagram #futurecars #car #indiancars #automobile #indiascar #india #carblog #carnews #carwar #carlifestyle #carlove #carspotting

2/3/2020, 3:22:00 PM

रेनो (रेनॉल्ट) मोटर्स इंडिया लवकरच आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे लाँच करणार आहेत. ही रेनोची एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार असेल. रेनोने प्रथमच अधिकृतपणे त्याची माहिती दिली आहे. रेनोची इलेक्ट्रिक कार त्यांच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक क्विडवर आधारित असेल. कंपनी ही कार रेनो सिटी के-झेडई (Renault City K-ZE) च्या नावाखाली लाँच करू शकते. रेनोने 2018 मध्ये पॅरिस मोटर शोमध्ये या इलेक्ट्रिक कारची संकल्पना आवृत्ती शोकेस केली होती, त्याचवेळी चीनमध्ये टेस्टिंग दरम्यानही सदर कार बघण्यात आली आहे. ही शून्य उत्सर्जन कार (zero pollution car ) मागील वर्षी सप्टेंबरमध्ये (2019) चायनाच्या "चेंगदू" मोटर शोमध्ये देखील प्रदर्शित केले गेली होती . रेनो के-झेडईमध्ये बर्‍याच नवीन वैशिष्ट्यांचा समावेश असेल, यात पुढील स्टाईलिंग ग्रिलसह एलईडी हेडलॅम्प्स मिळतील. तसेच टेल लँम्पस मध्ये एलईडी सेटअप दिसेल. ऑप्शन मध्ये वेगवान चार्जिंग फीचर उपलब्ध असेल. एका संपूर्ण चार्ज मध्ये सुमारे 271 किलोमीटर जाऊ शकणारी ही कार आपल्याकडे यावर्षी लाँच होईल आणि अंदाजे किंमत असेल 8 लाख रुपये (एक्स शोरूम) #electriccar #future #futurecars #india #renault #motomagindia #CarBhar #carsofinstagram #Renaultcars #indianauto #indianautomobiles #carwar #maharashtra #carmagazine

2/3/2020, 7:56:14 AM

यंदाच्या बजेटमध्ये वाहन बाजारात, वाहन कंपन्या आणि सोबतच ग्राहक यांची सरळ सरळ नाराजी दिसून येत आहे. वाहन स्क्रॅप (जुनी वाहने भंगारात विकणे व ईतर प्रक्रीया करणे ईत्यादी ) करण्याबद्दल धोरणाची कोणतीही नवी घोषणा न झाल्याने आणि चार चाकी व दुचाकी वाहनांसाठी जीएसटीत (GST) संभाव्य कपात करण्याबाबत कोणतेही मार्गदर्शक तत्त्व जाहीर न झाल्याने केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये देशांतर्गत वाहन उद्योग मोठ्या प्रमाणात निराश झाला आहे. -टिम कारभार. 02/02/2020 #budget2020 #india #indiancars #carsofindia #automobile #motomagindia #Carbhar

2/2/2020, 2:23:44 PM

मारुती सुजूकी कडून अल्टो k10 मॉडेलची विक्री बंद होत आहे. सुमारे 38 लाखांहून अधिक ग्राहकांनी पसंत केलेल्या अल्टो कार मधील K10 मॉडेल यावर्षी बंद केले जात आहे, मारुती सुजूकीचा दावा आहे की त्यांच्याच एस-प्रेसो (S-Press) मॉडेलमूळे K10 च्या विक्रीवर परिणाम झाला होता. #marutisuzuki #alto #carsofinstagram #car #indiancars #carsofindia #familycar #alto #marathi #india #newz #maharashtra #altok10 #motomagindia #CarBhar

2/1/2020, 6:35:13 PM

ताकदवर आणि तितकीच देखणी एसयूव्ही म्हणजे लॅण्ड रोवर डिस्कव्हरी ✌️ 75.18 लाख रुपये एक्स शोरूम किंमत असलेली ही कार आता 2 लिटर इंजिन क्षमतेमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. @landrover_in #cars #suv #landrover #discovery #lrdiscovery #india #offroad #carsofinstagram #indiascar #indiancars #carsofindia #automobile #landroverdefender #jaguarlandrover #amazingcars247 #carwar #car #motomagindia #CarBhar

1/28/2020, 12:16:26 PM

किया कार्निवलला पहिल्याच दिवशी सुमारे 1400 बूकिंग मिळाल्या आहेत. 21 जानेवारी रोजी या कारचे अधिकृत बुकिंग सुरू झाले असून याच दिवशी एका दिवसात किया मोटर्सच्या अधिकृत संकेतस्थळावर तथा अधिकृत डीलर्सकडे मिळून 1400 च्या वर बूकिंग कार्निवलला मिळाल्या आहेत. अधिक माहितीसाठी आम्ही लौकरच या कारचा अहवाल सादर करतोय. धन्यवाद 🙏 #kiacarnival #kia #carsofinstagram #indiascar #indiancars #kiamotors #automobile #carwar #maharashtra #mumbai #pune #kolhapur #satara #marathi #carnews #ahmednagar #motomagindia #CarBhar

1/23/2020, 10:58:21 AM

टेस्ला मॉडेल वाय (Y) ला मोठी टक्कर देईल अशी इलेक्ट्रिक कार म्हणजे बीटॉन एम-बाईट. एका संपूर्ण चार्ज मध्ये सुमारे 550 किलोमीटर जाऊ शकेल एवढी रेंज असणारी एम-बाईट दिसायलाही तितकीच देखणी आहे असे आम्हाला वाटते. 150 kW फास्ट चार्जर वापरुन ही कार 35 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते असे बीटॉन मोटर्सचे मत आहे. 0 ते 100 किमी प्रतितास ईतकी गति प्राप्त करण्यास एम-बाईटला फक्त 5.5 सेकंद एवढा कमी वेळ लागतो. आणि कमाल गती (मॅक्स स्पीड) एकूण आपणही हैराण व्हाल, कारण 190 किमी प्रतितास एवढ्या सुसाट वेगाने एम-बाईट धावू शकते. 2+2 किंवा 2+3 असे सिटिंग ऑप्शन या कारला उपलब्ध असतील. अद्याप विक्री सुरू झाली नसली तरी येत्या काही दिवसांत ही कार रस्त्यावर धावताना आपण पाहू शकाल, अर्थातच आम्ही म्हणल्याप्रमाणे टेस्ला मॉडेल वाय ला टक्कर देण्यास ही कार तयार आहे, योग्य वेळ येणे फक्त बाकी आहे. धन्यवाद 🙏 #electriccar #electriccars #car #carsofinstagram #carwar #india #carmagazine #automobile #autonews #india #carspotting #future #tesla #byton #bytonmbyte #motomagindia #CarBhar

1/19/2020, 4:58:28 PM

होंडा ऐक्टीवा 6G लाँच झाली आहे. 109 सीसी ची नवीन ऐक्टीवा बी एस 6 मानकांना पूरक आहे. सोबतच आता ऐक्टीवा 6G ला फॅन कूलिंग युक्त फ्यूल इंजेक्शन सिस्टम बसविण्यात आले आहे; पीजी - एमएफआय (PGMFI) आणि एसआय (SI) प्रकारात ती वर्गीकृत होतात. स्टॅन्डर्ड आणि डिलक्स अश्या दोन वेरिएंट मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली ऐक्टीवा 6G आता 6 वर्षांच्या वारंटी सोबत येते. 8 रंगसंगती मधून आपण ही स्कूटर निवडू शकतो जिची प्रारंभिक किंमत आहे 63,912/-रुपये (एक्स शोरूम) #honda #hondaactiva #hondaactiva6g #hondatwowheeler #india #bikes #scooter #moped #automobile #cars #india #motomagindia #CarBhar

1/17/2020, 5:27:09 PM

बेंटले मलसान ब्रिटिश कार कंपनी बेंटले मोटर्सने त्यांच्या पहिल्या व्ही 8 इंजिनला 61 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांनी मलसान 6.75 आवृत्ती लाँच केली आहे. सुमारे 6700 सीसी इंजिन समाविष्ट असलेल्या या कारचे इंजिन डब्ल्यूएलटीपी सायकल मनकांना पूरक आहे. 3.91 करोड रुपये एक्स शोरूम किंमत असलेली मलसान भारतात लौकरच विक्रीस उपलब्ध होईल. #bentley #bentleymotors #bentleymulsanne #mulsanne675 #supercar #luxurycar #carsofindia #carsofinstagram #carwar #bentleycontinentalgt #bentleycontinental #car #india #motomagindia #CarBhar

1/17/2020, 4:25:02 AM

मारुती सुझुकी च्या "वॅगन आर" ला भारतात लाँच होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याची वॅगन आर ही मूळच्या वॅगन आर ची सहावी जेनरेशन आहे. भारतात 1998 साली या कारचे पदार्पण झाले होते. आत्ताची (2019) वॅगन आर केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असून 998 सीसी आणि 1197 सीसी इंजिन्स त्यात समाविष्ट आहेत. मैनुअल आणि ऑटो अश्या दोन्ही प्रकारांत उपलब्ध वॅगन आर साधारण 20 ते 22.5 किमी प्रतिलिटर माइलेज देते. आमच्या दृष्टीने ही कार अनेक भारतीय कुटुंबांचा विश्वास संपादन करते जिची प्रारंभिक किंमत आहे 4.42 लाख रुपये (एक्स शोरूम) #marutisuzuki #marutisuzukiwagonr #wagonr #car #carsofinstagram #cars #familycar #carwar #automobile #maruti #suzuki #hatchback #india #carsofindia #indiancars #motomagindia #CarBhar

1/16/2020, 7:00:03 PM

फरारी पोर्टोफीनो : 3.9 लिटर व्ही 8 डबल टर्बोचार्ज (सुमारे 3855 सीसी) इंजिन असलेली फरारी 592 एच पी एवढी ताकद निर्माण करते. जगातील सर्वात वेगवान कार्स पैकी एक म्हणजे पोर्टोफीनो होय. 325 किमी प्रतितास एवढ्या उच्च वेगाने पोर्टोफीनो आरामात चालू शकते. 2017 साली लाँच झालेल्या या कार ला जगभरात भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. भारतात प्रारंभिक किंमत आहे 3.50 करोड रुपये एक्स शोरूम. #supercar #supercars #carsofinstagram #ferrari #ferrariportofino #carsofinstagram #india #carsofindia #luxurycar #speed #italian #car #carwar #red #carmagazine #carblog #supercarspotting #motomagindia #CarBhar

1/15/2020, 5:55:17 PM

लवकरच लाँच होणार्‍या संपूर्ण इलेक्ट्रिक टाटा नेक्सन ईव्ही मध्ये 30.2 किलोवॅट क्षमतेची बॅटरी बसविण्यात आली असून एका फूल चार्जमध्ये सुमारे 300 किमीपेक्षा जास्त रेंज नेक्सन ईव्ही देईल . 9.9 सेकंदात ही कार 0 ते 100 किमी प्रतितास ईतका वेग प्राप्त करु शकते . फास्ट चार्जर वापरुन 60 मिनिटांत बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते, आणि होम चार्जर वापरुन ते करण्यास साधारणतः 8 तास लागतील असा दावा केला जात आहे. टाटा नेक्सन ईव्ही येत्या काही आठवड्यांत भारतात लाँच होणार आहे. हे कंपनीचे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे ज्याचे वर्गीकरण कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये होते. या वाहनाची भारतात किंमत रु. 15 लाख ते 17 लाख रुपये (अंदाजे एक्स-शोरूम)असेल. नवीन टाटा नेक्सन ईव्ही हे नवीन झिपट्रॉन पॉवरट्रेन तंत्रज्ञान वापरणारे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे. #tatanexon #ev #nexonev #tatanexon #electriccar #tatamotors #sug #tataharrier #india #news #indiancars #carsofindia #carsofinstagram #maharashtra #electronicvehicle #tata #indiascar #ratantata #innovation #motomagindia #CarBhar

1/15/2020, 11:06:54 AM

कशी वाटली क्रिजलर S300? कमेंट करा, (आम्ही लौकरच या कारचा अहवाल सादर करतोय) #chrysler #carsofinstagram #carwar #india #carmagazine #carnews #automobile #indianauto #supercar #carlifestyle #chrysler300 #chryslers300 #car #maharashtra #motomagindia #CarBhar

1/15/2020, 7:08:08 AM

न्यूज अपडेट 📜 अधिक माहितीसाठी फॉलो करा @carbhar #cars #carsofinstagram #car #tata #volkswagen #bmwindia #audi #autoexpo #newdelhi # #carnews #bike #motorcycle #tata #tataharrier #marathi #maharashtra #mumbai #pune #kolhapur #satara #ahmednagar #aurangabad #nissan #mahindra #motomagindia #CarBhar

1/14/2020, 5:57:36 PM

अतिशय लक्झरी कार निर्माण करणार्‍या अॅक्यूरा या कार कंपनीकडून भारतात येत्या वर्षी पदार्पण होण्याची शक्यता आहे.अॅक्यूरा टीएलएक्स या त्यांच्या मध्यम श्रेणी सेडानच्या माध्यमातून ते भारतात आपले पदार्पण करतील असा आमच्या सूत्रांचा दावा आहे. सध्या टीएलएक्स 2 प्रकारात उपलब्ध होते, एक म्हणजे 2.4 लिटर इंजिन आणि दूसरी 3.5 लिटर पेट्रोल इंजिन जे अनुक्रमे 206 आणि 290 एचपी एवढी ताकद निर्माण करतात. या कारची प्रारंभिक किंमत सुरू होईल सुमारे 40 लाख रुपये (अंदाजे एक्स शोरूम). भारतात तिला टोयोटाची कॅमरी मुख्य स्पर्धक असेल. आमच्या दृष्टीने होंडा अॅकोर्ड टीएलएक्सशी स्पर्धा करणार नाही कारण स्वतः होंडा हे अॅक्यूरा कंपनीचे मूळ मालक आहेत. धन्यवाद 🙏☺️ #acuratlx #acura #honda #cars #car #sedan #carsofindia #carsofinstagram #carwar #car #carmagazine #speed #gasoline #sportscar #acuransx #hondaaccord #carblog #carlifestyle #motomagindia #CarBhar

1/14/2020, 12:34:47 PM

किती जणांना वाटते की मारुती जिप्सी बाजारात पुन्हा विक्रीस उपलब्ध व्हावी? #marutigypsy #maruti #marutisuzuki #gypsy #gypsyking #cars #jeep #offroad #suv #india #automobile #carsofindia #oldisgold #4x4 #carmagazine #autoblog #motomagindia #CarBhar

1/13/2020, 7:14:44 PM

2020 रॉयल एनफील्ड हिमालयन बीएस 6 मॉडेलचे लॉन्चिंग लवकरच अपेक्षित आहे. नवीन रंग-संगती , किरकोळ कॉस्मेटिक बदलांसह नवीन हिमालयीन आपल्या समोर हजर होईल. 411 सीसी इंजिन क्षमतेच्या हिमालयनला थोडे अजून कार्यक्षम करण्यात यावे अशी अपेक्षा आहे , कारण कमी आउटपुट असल्या कारणाने ऑफरोड सफरी काही अंशी अवघड वाटतात असा आमच्या सूत्रांचा दावा आहे. तथापि भारतीय बाजारात हिमालयन नक्कीच आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करते. सध्याचे 24.5 बीएचपी इंजिन समाविष्ट असलेल्या या बाईकची प्रारंभिक किंमत सुरू होते 1.66 लाख ते 1.83 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) #royalenfield #himalayan #rehimalayan #royalenfield #bikes #motorcycle #offroad #bs6 #india #enfield #roadandbike #maharashtra #carnews #speed #motomagindia #CarBhar

1/13/2020, 2:20:44 PM

2020 मध्येच लाँच होत असणार्‍या महिंद्राच्या नवीन थार ला दक्षिण भारतात पुन्हा एकदा टेस्टिंग सुरू असताना स्पॉट केले गेले आहे. 2020 महिंद्रा थारला बीएस 6 अनुरूप डिझेल इंजिन असेल. पूर्वीप्रमाणेच आताही हेवी-ड्यूटी 4x4 सिस्टम तिच्यात समाविष्ट करण्यात येईल यात तिळमात्रही शंका नाही. फोटो पाहता लक्षात येईल की नवीन थार पूर्वीच्या थारपेक्षा अधिक रुंद दिसत आहे सोबतच एलईडी टेल लँम्पसही पाहावयास मिळत आहेत. जीप कंपनीच्या कार्स प्रमाणे पुढील ग्रिल दिसून येते. आणखी काही माहिती घेण्यासाठी तुमच्यासोबतच आम्ही टीम "कारभार" या नव्या कोऱ्या थारची लाँच होण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. फोटो सौजन्य : Car and Bike #mahindrathar #thar #testing #carspotting #newcar #suv #jeep #mahindra #offroad #4x4 #india #automobile #jeepgram #indiancars #carsofindia #tharlover #harrier #tataharrier #auto #marathi #maharashtra #motomagindia #CarBhar

1/13/2020, 7:46:14 AM

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने सन 2019 मध्ये सुमारे 9641 वाहनांची विक्री केली आहे. बीएमडब्ल्यू इंडियाने भारतीय बाजारात उत्पादित एसयूव्ही श्रेणीची 50 टक्क्यांहून अधिक विक्री केली, ज्यामध्ये एक्स 5, एक्स 3 आणि एक्स 1 सारख्या कार्सचा समावेश आहे. बीएमडब्ल्यू इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुद्रतेज सिंह यांनी नवीन बीएमडब्ल्यू एम 3 सीरिज चे अनावरण करताना ही माहिती दिली. #bmw #bmwindia #cars #indiancars #carsofindia #automobile #sedan #xuv #bmwx1 #bmw3 #bmwx5 #bmwx6 #bmwcars #carsofinstagram #car #motomagindia #india #autonews #CarBhar

1/9/2020, 6:28:35 AM

2020 इनोव्हा क्रिस्टा BS6 लाँच झाली आहे. इनोव्हा क्रिस्टाला मागच्याप्रमाणेच 2 डिझेल इंजिन देऊ केली आहेत.  2.4-लिटर आणि 2.8-लिटर डिझेल आणि अर्थातच सोबत 2.7-लिटर पेट्रोल इंजिनही उपलब्ध आहे. ही सर्व इंजिन बीएस 6 निकषांचा अवलंब करतील. या क्रिस्टामध्ये टीएफटी मल्टी इन्फोर्मेशन डिस्प्ले, डीव्हीडी प्लेयरसह टच-स्क्रीन सिस्टम, द्वितीय व तृतीय रांगेसाठी एसी व्हेंट्स इत्यादी महत्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये भर म्हणजे मनमोहक फिनिश असलेले इंटीरियर समाविष्ट आहे. 2.4 लिटर जीडी डिझेल इंजिन सुमारे 147 बीएचपी आणि 2.8 लिटर इंजिन 171 बीएचपी एवढी ताकद निर्माण करते. टोयोटा इनोव्हा क्रिस्टाने लूक, स्पेस आणि कामगिरीच्या बाबतीत तिच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. टोयोटा इनोव्हाचा प्रवास सुमारे 2005 साली भारतात सुरू झाला, जेव्हा टोयोटाने क्वालिसच्या बदली लोकांना इनोव्हा उपलब्ध करून दिली. या नव्या क्रिस्टाची प्रारंभिक किंमत सुरू होते 15.36 लाखांपासून (एक्स शोरूम) #innovacrysta #toyotainnova #india #automobile #car #cars #carsofindia #carblog #motomagindia #CarBhar

1/7/2020, 1:08:51 PM

हुंडाई ऑरा : छान प्रकारे एलईडी लाईट्स चा समावेश करून देण्यात आल्याने ऑरा आकर्षक वाटते. केबिनमध्ये 5.3 इंचाचा डिजिटल स्पीडोमीटर कंसोल आणि 8 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे. ऑरा दोन पेट्रोल आणि 1 डिझेल इंजिन माध्यमात उपलब्ध असून, हे इंजिन्स बीएस 6 अनुरूप आहेत. त्यापैकी 1.2-लिटर पेट्रोल 82 बीएचपी आणि 114 एनएमचा टॉर्क उत्पन्न करते , त्याचप्रमाणे आणखी एक इंजिन 1 लीटर टर्बोसह 99 बीएचपी आणि 172 एनएम टॉर्क उत्पादित करते, आमच्या दृष्टिने हे एक शक्तिशाली इंजिन आहे तथापि, 1.2 लीटर डिझेल इंजिन 74 बीएचपी आणि 190 एनएम टॉर्कसह उपलब्ध आहे. हुंडाईच्या या नवीन ऑरा साठी बुकिंग सुरू होत असून सुमारे 10000/- रुपये एवढी रक्कम भरून ग्राहक ऑरा बुक करू शकतात. भारतीय बाजारात ऑरा ही स्विफ्ट डिजायर, अमेज, अमेओ आणि फिगो अस्पायर यांचाशी स्पर्धा करेल . प्रारंभिक किंमत असेल सुमारे 6 लाख रुपये (एक्स शोरूम) #hyundaiaura #car #india #automobile #drive #newcar #carsofinstagram #hyundai #swift #motomagindia #CarBhar

1/5/2020, 5:47:19 PM

तुम्हाला माहिती आहे का? या ब्रेक सिस्टीम ला काय म्हणतात? आणि ती कुठल्या कुठल्या बाईक्समध्ये याआधी वापरली गेली आहे? कमेंट करा 🏍 #bikes #motorcycle #india #brakingsytem #motomagindia #automobile #bikesofinstagram #bikegram #classicbike #racing #retro #brakes #brembo #CarBhar

1/5/2020, 8:56:27 AM

बजाज पल्सर 160 : बजाज ऑटोने नुकतीच नवीन पल्सर 160 लाँच केली आहे. 15.5 बीएचपीचे 5 स्पीड 160.3 सीसी पेट्रोल इंजिन समाविष्ट असलेल्या पल्सर 160 ला एबीएस आणि मागील चाकाला डिस्क ब्रेक उपलब्ध नाहीत. साधारण 45 ते 50 किलोमीटर प्रतिलिटर एवढे माइलेज ही बाईक देते. अजून तरी बीएस4 इंजिन समाविष्ट असून या पल्सरला बाजारात किती पसंती मिळेल हे आपल्याला लौकरच समजेल. टॉप स्पीड आहे सुमारे 115 किमी प्रतितास आणि एक्स शोरूम किंमत सुरू होते सुमारे 82,000/- रुपयांपासून. धन्यवाद ! #bajajpulsar #pulsar160 #bikes #motorcycle #bikesofinstagram #automobile #india #sportsbike #pulsar #motomagindia #CarBhar

1/3/2020, 8:39:40 AM

"जीडब्ल्यूएम" ( ग्रेट वाल मोटर्स) लौकरच करणार भारतात पदार्पण : ग्रेट वॉल मोटर्स कंपनी लिमिटेड ही एक चायनीज ऑटोमोबाईल निर्माता असून तिचे मुख्यालय हेबई (चीन) येथे आहे. या कंपनीचे नाव ग्रेट वॉल ऑफ चायना वरुन ठेवले गेले होते आणि कंपनीची स्थापना सन 1984 मध्ये झालेली आहे ."जीडब्ल्यूएम" चीनमधील सर्वात मोठी स्पोर्ट युटिलिटी व्हेकल (एसयूव्ही) आणि पिक-अप ट्रक उत्पादक कंपनी आहे. 1984 मध्ये स्थापनेनंतर ग्रेट वॉलने सुरुवातीला केवळ ट्रक तयार केले, आणि त्यांनी 2010 पर्यंत एकही सेडान कारची निर्मिती केली नव्हती. कंपनी 1998 मध्ये चीनी पिक-अप ट्रक मार्केटमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचली आणि एक यशस्वी पिक-अपचे एक निर्माता म्हणून "जीडब्ल्यूएम" कडे पाहिले जाऊ लागले. 2006 मध्ये ग्रेट वॉलने युरोपमध्ये आपली वाहन विक्री सुरू केली, त्यात सुरुवातीला काही व्हॅन देण्यात आल्या. त्याचवेळी इटलीलाही काही एसयूव्ही पाठवल्या गेल्या आणि कालांतराने ऑस्ट्रेलियन बाजारात ग्रेट वॉल उत्पादने प्रथमच उपलब्ध झाली. सन 2010 पर्यंत ही कंपनी फक्त युरोपियन युनियनमध्ये विक्री करणारी चिनी कार उत्पादक कंपनी होती. एप्रिल 2017 मध्ये, ग्रेट वॉल मोटर्सने डब्ल्यूईवाय(WEY) नावाचा एक नवीन प्रीमियम एसयूव्ही ब्रँड सादर केला, आणि मे 2017 मध्ये कंपनीने आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन "ग्रेट वॉल सी 30 ईव्ही" लाँच केले. जुलै 2018 मध्ये ग्रेट वॉल आणि जर्मन कार निर्माता "बीएमडब्ल्यूने" चीनमध्ये इलेक्ट्रिक मिनी वाहने तयार करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली. "जीडब्ल्यूएम" भारतीय बाजारात हवल एच6 या कारमार्फत आपले पदार्पण करेल असा अंदाज आमच्या सुत्रांनी वर्तविला आहे. धन्यवाद. #greatwallmotors #gwm #india #cars #carsofinstagram #sedan #suv #maharashtra #motomagindia #CarBhar

1/2/2020, 2:42:13 PM

फॉक्सवॅगन तिग्वान 7 सीटर होणार 2020 मध्ये भारतात लाँच, तत्पूर्वी भारतात अजून हवे तेवढे यश या कारला (5 सीटरला) मिळाले नसले तरी, एक समृद्ध एसयूव्ही म्हणून फॉक्सवॅगनच्या तिग्वान कडे पाहिले जाते. सुरक्षा वैशिष्ट्ये आणि परफाॅर्मन्स यामुळे आम्ही परिपूर्ण एसयूव्ही असे तिग्वानला संबोधू इच्छितो परंतू कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी तिग्वानची किंमत खूप जास्त प्रमाणात अधिक असल्याचे दिसून येते. तिग्वानचे 1968 सीसी डिझेल इंजिन सुमारे 17 किमी प्रतिलिटर माईलेज देते आणि प्रारंभिक किंमत सुरू होते 27 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) #vwtiguan #volkswagen #carblog #carsofinstagram #car #india #motomagindia #CarBhar

12/30/2019, 6:24:52 PM

बीएस-6 उत्सर्जनांच्या नवीन नियमांमुळे बजाज ऑटो लवकरच बीएस-6 पल्सर रेंज बाजारात आणेल अशी शक्यता आमच्या सुत्रांनी वर्तविली आहे. 125 सीसी, 150 सीसी, 180 सीसी, 200 सीसी आणि 220 सीसी रेंजमधून आपण पल्सर निवडू शकतो. सध्याची पल्सरची प्रारंभिक किंमत सुरु होते रुपये 65 हजार पासून ते 1.18 लाख रुपये (एक्स शोरूम) #bike #bikesofinstagram #biker #bajaj #bajajpulsar #automobile #bikegram #sportsbike #motomagindia #CarBhari

12/28/2019, 6:32:54 PM

7.80 लाखांपासून किंमत सुरू होणार्‍या मारुती सुजुकीच्या विटारा ब्रेझा वर सुमारे 91 हजार रुपये पर्यंतचा डिस्काउंट सुरू आहे. त्यात 40 हजार रुपये रोख, 20 हजार रुपये एक्स्चेंज बोनस अधिक 5 वर्षांची वारंटी आणि रुपये 10 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट असा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधावा. @msarenaofficial #marutisuzuki #vitarabrezza #india #automobile #cars #carsofinstagram #car #automobile #drive #carnews #maharashtra #mumbai #pune #kolhapur #satara #ahmednagar #aurangabad #nagpur #motomagindia #CarBhari

12/28/2019, 5:28:47 AM

भारतीय बाजारात घवघवीत यश संपादन केलेल्या किया मोटर्सच्या सेल्टोसला आत्तापर्यंत सुमारे 90000 बुकिंग मिळाल्या असतानाच येत्या 2020 मध्ये सेल्टोसचे इलेक्ट्रिक वेरिएंट लाँच होण्याची शक्यता आमच्या सुत्रांनी वर्तविली आहे. हुंडाईच्या "कोना" या इलेक्ट्रिक कारशी खासकरून ही सेल्टोस स्पर्धा करेल असे वाटते. प्रारंभिक किंमत असेल सुमारे 20 लाख रुपये (अंदाजे एक्स शोरूम) छाया : Indiatoday. #kiaseltos #kia #india #cars #motomagindia #carBhari #carsofinstagram #car #indiancars #automobile #maharashtra

12/26/2019, 6:51:04 AM

जीप कंपास बीएस 6 चे टेस्टिंग सुरु असताना तिला आम्ही कॅमेऱ्यात पुन्हा कैद केले आहे. फोटो सौजन्य: @vishnu.sasidharan.1297 #jeepcompass #bs6 #jeepindia #jeep #compass #automobile #india #auto #car #carsofinstagram #motomagindia #CarBhari

12/23/2019, 9:53:39 AM

डूकाटी मोटर्स सादर करीत आहेत 2020 पॅनीगेल व्ही 4. सुमारे 214 एचपी ताकद निर्माण करणारी दुचाकी, जी 1,103 सीसी इंजिन क्षमतेसह डेस्मोसेदिसि स्ट्रॅडाले (Desmosedici Stradale) तंत्रज्ञानाने विकसित आहे. 3 प्रकारात मोडत असलेल्या आणि 2018 साली सर्वप्रथम लाँच झालेल्या या सिरीजची प्रारंभिक किंमत सुरु होते 22 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) #ducati #ducatipanigale #PanigaleV4 #ducatipanigalev4 #sports #ducatiindia #motomagindia #CarBhari

12/21/2019, 6:35:11 PM

2020 साली भारतात लाँच होत असलेल्या नवीन किया ऑप्टिमा उर्फ ​​K5 सेडानला मागील महिन्यात दक्षिण कोरियामध्ये प्रदर्शित केले गेले होते ; आता किया मोटर्सने या सेडानबद्दल अतिरिक्त माहिती उघड केली आहे. हे नवीन मॉडेल त्याच्या पूर्वीच्या तुलनेत अधिक आकर्षक आहे जे एका नवीन डिझाईनमुळे आगळी-वेगळी छाप पाडते, तसेच नवीन किया K5 त्यांच्या पूर्वीच्या सेडान हून अधिक लांब आणि रुंद आहे, लांबी 50 मिमीने वाढवून 4,905 मिमी. केली आहे, तर रुंदी 25 मिमीने 1,860 मिमी. पर्यंत वाढते. एवढेच नव्हे तर व्हीलबेसही 2,850 मिमी. केला गेला आहे; तथापि उंचीमध्ये 20 मिमी.ची कमी केल्याचे आढळते जी 1,445 मिमी. ईतकी आहे. उत्तर अमेरिकेतील ग्राहकांसाठी आणि कंपनीच्या "घरगुती" कोरियन मार्केटसाठी, कियाच्या नवीन "कंटीन्यूव्ह व्हेरिएबल वाल्व्ह डूरेशन" (CVDV, सीव्हीव्हीडी) तंत्रज्ञानासह 1.6-लीटरचे टी-जीडीआय (TGD-i) इंजिन उपलब्ध असेल. सुमारे 178hp ईतकी उर्जा उत्पादन करण्यास हे इंजिन सक्षम आहे. विविध बाजारांवर अवलंबून इतर इंजिन पर्यायांमध्ये 150 एचपी / 192 एनएमचे 2 लिटर एमपीआय (MPI) इंजिन कन्टीनू व्हेरिएबल व्हॉल्व्ह लिफ्ट (सीव्हीव्हीएल) तंत्रज्ञान वापरुन विकसित केले आहे. जीडीआय (GD-i) इंजिन सुमारे 191 एचपीचे असून 246 एनएम ईतका टोर्क निर्माण करते. याचबरोबर किया K5 मध्ये हायब्रिड इंजिनचा सुद्धा समावेश करतील असा आमच्या सूत्रांचा दावा आहे. ही सर्व इंजिन्स सहा किंवा आठ स्पीड ऑटो ट्रान्समिशनवर उपलब्ध होतील. नव्या किया K5 सेडानला स्मार्ट, कम्फर्ट, इको, स्पोर्ट आणि कस्टम असे पाच ड्रायव्हिंग मोड मिळतील. भारतात किया K5 ची प्रारंभिक किंमत असेल सुमारे 40 लाख रुपये (अंदाजे) #kiaoptima #kia #kiamotors #kiak5 #carsofinstagram #carsofindia #cars #kiastinger #motomagindia #CarBhari

12/19/2019, 3:00:34 PM

गेल्या ५ वर्षात मारुती सुझुकीने सुमारे ६ लाख ऑटोमॅटिक कार्सची विक्री केल्याचे जाहीर केले आहे. #carsofindia #marutisuzuki #india #automobile #cars #autonews #carnews #carlovers #suzuki #motomagindia #CarBhari

12/18/2019, 5:10:39 AM

लॅम्बोर्गिनी उरुस: एक सुपर स्पोर्ट्स कार एसयूव्ही या दोन्हींना समाविष्ट करणारी कार म्हणजे लॅम्बोर्गिनी उरुस होय. उरुस ही जगातील पहिली सुपर स्पोर्ट युटिलिटी कार आहे. लूक्स आणि परफॉर्मन्स या दोहोंमध्ये कुठलीही तडजोड न करता उरुस वाहन क्षेत्रामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करते. प्रगत डिझाइन, विलक्षण ड्रायव्हिंग गतिशीलता आणि रोमांचकारी कामगिरी या सर्वांमुळे उरुस जगातील पहिली सुपर स्पोर्ट एस.यू.व्ही. बनू शकली. डिझाइनमध्ये अत्यंत अष्टपैलुत्व असलेल्या उरुसचे विभाजन ऑफ-रोड आणि ऑन रोड अश्या दोन्ही प्रकारात होत असताना उरुस केवळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही तर त्यांच्या गरजा सुद्धा पुर्ण करते. 8 सिलेंडर ,3996 सीसी पेट्रोल इंजिन सुमारे 642 बी.एच.पी इतकी अफाट ताकद निर्माण करते. 305 किमी. प्रतितास एवढी गती प्राप्त होणाऱ्या 4 व्हील ड्राईव्ह उरुसला सुमारे 8 किलोमीटर प्रतिलीटर एवढे माईलेज मिळते. बऱ्याच अंशी कार्बन फायबर पार्ट वापरून तयार केलेल्या उरुसला बाजारात अजून तरी खास सुपर स्पोर्ट एस.यू.व्ही. कार शर्यतीत नसून पोर्शे कायान,मर्सिडीज बेंझ जी-क्लास आणि बेंटले बेंटेयगा या काही कार्स उरुस विरोधात स्पर्धा करीत आहे. या आलिशान कार ची किंमत सुरु होते रुपये 3.10 करोड रुपयांपासून.(एक्स शोरुम) #lamborghini #urus #lamborghiniurus #lambo #lamborghiniaventador #carsofinstagram #carlovers #indiancars #carsofindia #mumbai #pune #kolhapur #satara #ahmednagar #aurangabad #india #car #motomagindia #CarBhari

12/16/2019, 12:12:52 PM

अशी दिसेल 2020 रेनॉ कॅप्चर. @renaultindia @grouperenault #renault #renaultcaptur #india #200 #automobile #motor #motors #car #carsofinstagram #carlifestyle #carnews #carlaunch #indian #motomagindia #CarBhari

12/10/2019, 12:46:43 PM

येत्या जानेवारी महिन्यात एमजी मोटर्स भारतात "झेड-एस" इव्ही ही इलेक्ट्रिक मिनी एसयूव्ही कार सादर करणार आहे. 44.5 केडब्ल्यूए हाय डेंसिटी असलेल्या बॅटरीयुक्त समाविष्ट असलेली "झेड-एस" सुमारे 340 किलोमिटर ईतके अंतर एका चार्जमध्ये गाठू शकेल असा कंपनीचा दावा आहे. 142 पीएस पावर असलेल्या "झेड-एस" मध्ये 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी केवळ 8.5 सेकंद एवढा कमी वेळ लागतो. लंडन स्टाईल हेडलॅम्प्स आणि स्पोर्टी टेललॅम्प्स व स्काय रूफ (अधिक लांबीचे सन रूफ) यांनी "झेड-एस" च्या आकर्षणात आणखीनच भर पडताना दिसते. 100% AC टाईप चार्जसाठी 6 ते 8 तास; आणि DC टाईप चार्ज करता सुमारे 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी या इलेक्ट्रिक कारला फक्त 50 मिनिटे लागतात असे कंपनीचे मत आहे. आकर्षक लूक, चांगला परफॉर्मन्स आणि सेफ्टी फीचर्सयुक्त पूर्ण असलेल्या "झेड-एस" ला भारतात भरभरून प्रतिसाद मिळेल असा आमच्या सूत्रांचा दावा आहे. या कारची प्रारंभिक किंमत असेल 20 ते 23 लाख रुपये (एक्स शोरूम) #mgmotors #mgzsev #mghector #india #automobile #carsofindia #carsofinstagram #motomagindia #CarBhari

12/9/2019, 9:53:19 AM

ऑडी क्यू 8 286 आणि 340 बीएचपी V6 टीडीआय आणि टीएसएफआय इंजिनयुक्त समाविष्ट असलेली ऑडी क्यू 8 येत्या जानेवारी मध्ये भारतात लाँच होईल. 6 कॅमेरे, 12 अल्ट्रासाऊंड सेन्सर आणि लेजर स्कॅनर हे काही अत्याधुनिक फीचर्स क्यू 8 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रारंभिक किंमत असेल सुमारे 1 ते 1.40 करोड रुपये. #audiq8 #audi #audiindia #audigramm #automobile #india #carsofindia #cars #carsofinstagram #india #motomagindia #motomagmarathi

11/16/2019, 6:25:44 AM

बी एस 6 इंजिन समाविष्ट असलेल्या आणि 2020 पासून विक्री सुरू होणार्‍या जीपच्या कंपासला "टेस्ट" देताना आम्ही कॅमेर्‍यात कैद केले आहे. सध्या पाहता कंपासमध्ये बाह्य आणि अंतर्गत काही नवीन बदल दिसून येत नाहीत . भारतात उपलब्ध असणार्‍या कॉम्पॅक्ट एसयूव्ही पैकी जीप कंपास एक प्रमुख कार आहे. प्रारंभिक किंमत आहे 14.99 लाख रुपये (एक्स शोरूम) #jeepindia #jeepcompass #cars #carsofinstagram #india #automobile #automotive #maharashtra #marathi #carlifestyle #carblog #compass #jeep #adventure #4x4 #motomagindia #motomagmarathi

11/11/2019, 5:15:16 AM

Renault कडून ट्रायबरच्या १०००० युनिट्स ची विक्री पूर्ण #carindia #automotivephotography #india #carsofinstagram #renaulttriber #car #motomagmarathi #motomagindia

11/9/2019, 4:02:50 AM

2020 मध्ये भारतात होणार लाँच : नवीन एप्रिलिया आरएस 660 ही स्पोर्ट्स बाईक 660 सीसी पॅरालल ट्विन इंजिनयुक्त समाविष्ट आहे, त्यांच्या ट्युनो व्ही 4 आणि आरएसव्ही 4 वर आधारित 1100 सीसी युनिटमधून आरएस 660 प्राप्त केली गेली आहे. कंपनीच्या अनुमानानुसार, आरएस 660 ही 100 बीएचपी आणि 90 एनएम टॉर्क उत्पादित करेल. प्रारंभिक किंमत असेल 14 ते 22 लाख रुपये (एक्स शोरूम अंदाजे) #aprilia #apriliars660 #apriliaracing #bikes #bikesofinstagram #biker #sports #superbike #motomagindia #motomagmarathi

11/6/2019, 5:07:47 AM

मे 2019 पूर्वी तयार झालेल्या महिंद्रा एक्सयूव्ही 300 पैकी काही कार्सला सस्पेंशनच्या तांत्रिक अडचणींमुळे तपासणी साठी परत मागविले आहे, आणि सदोष वाहनांना यामधून ठिक केले जाईल. #carsofinstagram #cars #automobile #mahindraxuv300 #india #motomagindia #motomagmarathi

11/5/2019, 7:46:39 AM

काहीतरी भन्नाट ❤️ कशी वाटली कस्टमाईज्ड रॉयल ईन्फिल्ड इंटरसेप्टर 650?? कमेंट मध्ये आपले मत व्यक्त करा... Source : @abhinavbhatt19 #india #motorcycle #automobile #bikes #bikesofinstagram #royalenfield #interceptor650 #interceptor #indian #carsofindia #biker #motomagindia #motomagmarathi

10/30/2019, 4:53:30 PM

अशी दिसेल 2020 हुंडाई क्रेटा. बीएस 6 इंजिन आणि सनरूफ सोबत होईल लाँच. #2020hyundaicreta #india #motomagindia #cars #carsofinstagram #india #automobile #automotive #maharashtra #marathi #carlifestyle #carblog #motomagmarathi

10/26/2019, 4:29:34 PM

बेनेली सादर करीत आहेत , क्लासिक स्टाईलिंग असणारी ईम्पीरियाल 400. खरोखरच क्लासिक लूक असलेल्या नवीन बेनेली ईम्पीरियाल 400 ला त्यांच्या 1950 च्या दशकात उत्पादित केल्या गेलेल्या बेनेली-मोटोबाय श्रेणीवर आधारीत बनविले आहे. ईम्पीरियाल 400 मध्ये 374 सीसी क्षमतेचे इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन एसओएचसी, सिंगल-सिलिंडर-फोर-स्ट्रोक, एअर-कूल्ड (बीएस 4) इंजिन समाविष्ट केले गेले आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले असून सुमारे 21 पीएस पॉवर निर्माण करते. ईम्पीरियाल 400 मध्ये सुंदर असे लिक्विड-क्रिस्टल डिस्प्लेयुक्त (टीएफटी एलसीडी) क्लस्टर मीटर बसविले गेले आहे. पुढील चाकास 300 मि.मी डिस्क ब्रेक व मागील बाजूस 240 मि.मी डिस्क ब्रेक समाविष्ट करण्यात आले आहेत. ड्युअल-चॅनेल एबीएस सोयीसह उपलब्ध असलेली ईम्पीरियाल 3 रंगसंगती मधून आपल्याला निवडता येईल. 4 हजार रुपये टोकन रक्कम भरून आपण ही दुचाकी बेनेलीच्या अधिकृत वितरकांकडे बूक करू शकतो. प्रारंभिक किंमत आहे 1.69 लाख रुपये (एक्स शोरूम) #benelli #dskbenelliindia #imperial400 #bike #bikesofinstagram #carblog #automobile #motors #india #carlifestyle #auto #speed #maharashtra #motomagindia #motomagmarathi

10/23/2019, 4:50:11 PM

यांनी दाखवून दिलं, "डिस्कव्हरीचे" खरे "मालक" आम्हीच ... हे फक्त भारतातच होऊ शकतं... 😂 #cars #india #jugaad #motomagindia #motomagmarathi #tata #landrover #discovery

10/23/2019, 7:44:31 AM

टोयोटा कडून 2020 यारीस हॅचबॅक बद्दल अधिकृत छायाचित्र व थोडा तपशील उपलब्ध झाला आहे. चौथ्या पिढीच्या यारीस हॅचबॅकचे नव्याने डिझाईन तयार केले गेले आहे. या कारसाठी खास तयार केलेले तीन सिलेंडर इंजिन हायब्रीड (पॉवरट्रेन) आहे. मागील यारीस प्रमाणेच नवीन प्रीमियम हॅचबॅक युरोपियन ग्राहकांना लक्षात घेऊन डिझाइन केले गेले आहे. तथापि ते संपूर्ण जगभरात लाँच होण्याची शक्यता आहे. #automobile #autonews #toyotayaris #toyota #india #motomagindia #motomagmarathi

10/19/2019, 6:30:04 PM

भारताबाहेर यशस्वी असलेल्या फॉक्सवैगनच्या एटलस पाठोपाठ एटलस क्रॉसस्पोर्ट या नवीन मिडसाइज एसयूव्हीचे 2020 मध्ये लॉन्चिंग होत आहे, सदर कार भारतात याच वेळी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एटलस क्रॉसस्पोर्ट 3 रो मिडसाइज एसयूव्ही आहे ज्यात 3.6 लिटर व्हीआर 6 किंवा 2.0 टी इंजिन उपलब्ध होईल, एटलस क्रॉसस्पोर्ट "4 मोशन एडब्ल्यूडी" (4MWD) प्रकारात उपलब्ध असेल . किंमत 25 ते 35 लाख ईतकी असण्याची शक्यता आमच्या सुत्रांनी वर्तविली आहे. #vw #volkswagen #vwatlas #atlascrossport #india #carsofinstagram #motomagmarathi #motomagindia

10/14/2019, 5:48:43 PM

मुंबईची काली पिली होतेय बंद : मुंबईसारख्या मोठ्या शहरातील 'पद्मिनी' नावाच्या टॅक्सीचा प्रवास आता संपणार आहे. जून 2020 नंतर या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर वापरण्यास पूर्णपणे बंद होतील. सुंदर अश्या टॅक्सी 'पद्मिनी' चे उत्पादन सन 2000 मध्ये थांबले आहे. पुढे 2013 मध्ये वाढते प्रदूषण लक्षात घेता २० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशा परिस्थितीत पद्मिनीला रस्त्यावरुन काढून टाकणे ही एक सक्ती बनली आहे; तथापि प्रत्येक मुंबईवासी त्यांच्याशी भावनिकरित्या जोडलेला आहे म्हणून पद्मिनीचा अभाव नेहमीच त्यांना खात राहील. या टॅक्सी जून 2020 पासून मुंबईच्या रस्त्यावर पूर्णपणे बंद केल्या जातील. सध्या केवळ (पद्मिनी) 50 टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. सदर कार वर्ष 1964 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, कंपनीने ही कार याच वर्षी फियाट 1100 डिलाईट नावाने सुरू केली होती. डिलाईट ही फियाट 1100 ची स्वदेशी आवृत्ती होती. लाँचनंतर एका वर्षानंतर त्याचे नामकरण "प्रेसिडेंट"असे करण्यात आले. पुढे 9 वर्षानंतर 1974 मध्ये हे पुन्हा एकदा "प्रीमियर पद्मिनीचे" नामकरण करण्यात आले. Image : Social #kalipili #taxi #mumbai #bombay #transport #cars #premierpadmini #mumbaistagram #india #motomagindia #motomagmarathi

10/14/2019, 4:10:52 PM

जावा कंपनीचा ब्रँड अस्तित्वात आल्यापासून 90 वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने जावाने ड्युअल चॅनेल एबीएस जावावर आधारित मर्यादित आवृत्तीची मोटारसायकल सादर केली आहे. जावा च्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त हे विशेष आवृत्ती मॉडेल केवळ 90 युनिट्सपुरते मर्यादित असणार आहे. हे विशेष आवृत्ती मॉडेल 15 ऑक्टोबर 2019 रोजी जावाच्या डीलर्सकडे पोहोचेल आणि बुकिंग असणार्‍या ग्राहकांना 22 ऑक्टोबरपर्यंत एक लकी-ड्रॉ पद्धतीने केवळ 90 जणांना वितरित केले जाणार आहे. या मर्यादित आवृत्तीला जावा 500 (सन 1929-1933) ओएचव्हीद्वारे प्रेरित रंगसंगती घेतल्या आहेत. (जावा ब्रांडची 500 ओएचव्ही पहिली मोटरसायकल 1929 मध्ये तयार करण्यात आली होती.)यातील प्रत्येक मोटारसायकलच्या इंधन टाकीवर 90 व्या वर्धापन दिनानिमित्तचे विशिष्ट चिन्ह देखील देण्यात येणार आहे. सदर मोटारसायकलची तांत्रिक वैशिष्ट्ये अद्यापही कायम आहेत; यात 293 सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, डीओएचसी इंजिन आहे जे 27 एचपी आणि 28 एनएम टॉर्क निर्माण करते. या मोटरसायकलची किंमत आहे 1.72 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली). #jawa #jawamotorcycles #jawaohc500 #motorcycle #bikes #anniversary #india #motomagindia #motomagmarathi

10/10/2019, 6:46:21 AM

मर्सिडीजच्या एस क्लास 350 डी सेडानवरवर सुमारे 15 लाख रुपयांची डिस्काउंट ऑफर सुरू आहे. 286 एचपी, 3.0 लिटर डिझेल इंजिन, प्लश इंटिरिअर्स आणि विकसित तंत्रज्ञान यांनी एस क्लास संपूर्ण आहे! #mercedessclass #s350 #cars #carsofinstagram #car #india #motomagindia #motomagmarathi

10/7/2019, 8:51:42 AM

राजदूत 350: आरडी म्हणून ओळखली जाणारी राजदूत 350 ही दुचाकी 1983 ते 1989 या काळात एस्कॉर्ट ग्रुपने भारतात बनवलेली टू (2)स्ट्रोक यामाहा होती. आरडी म्हणजे 'रेस डेरिव्हिड', ज्याची ओळख राजदूतने यामाहा जपानच्या सहकार्याने भारतात उदयास आणली . भारतीय शर्तींच्या अनुषंगाने सुधारित केलेली यामाहा "आरडी 350B", ची प्रत म्हणजेच भारतीय राजदूत 350 होय. 1990 च्या मध्यात एअर-कूल्ड यामाहा आरडी 350 चे उत्पादन उत्सर्जनांच्या कठोर नियमांमुळे संपले असले तरी 1983 मध्ये भारतीय बाजारपेठेतील तांत्रिकदृष्ट्या प्रगत मोटारसायकल म्हणून आरडी 350 कडे पाहीले जायचे. आरडी दोन प्रकारांत उपलब्ध होती, ते म्हणजे "हाय टॉर्क" आणि "लो-टॉर्क" हे इंजिन्स अनुक्रमे 30.5 आणि 27 बीएचपी ताकद उत्पन्न करतात जे की 347 सीसी पॅरलल ट्विन , रीड वाल्व, 6-स्पीड ट्रांसमिशन, ऑटोलोब सिस्टम, मेकॅनिकल टॅकोमीटर, 12 व्होल्ट इलेक्ट्रिक इत्यादी गोष्टींनी समाविष्ट आहेत. 0-60 किमी / प्रतितास ही गति प्राप्त करण्यास चार सेकंदांपेक्षा कमी वेळ आरडी 350 ला लागतो. सदर मोटरसायकल यामाहाची पेटंट टोर्क इंडक्शन सिस्टम (TIS) ने समाविष्ट होती. आणि त्यावेळी पुढच्या चाकाला येणारे डिस्क ब्रेक (ऑप्शनल) ही यामाहा आरडी 350 ची मुख्य खासियत होती. भारतात पोलीस अधिकार्‍यांकडून गुन्हेगारांना अधिक चांगल्याप्रकारे पकडण्यासाठी पोलिस खात्याला यमाहा आरडी 350 मोटारसायकली देण्यात आल्या, तथापि जड रॉयल एनफिल्ड्स चालविण्याची सवय असलेले पोलिस-दल आरडीची ताकद हाताळू शकले नाहीत. यात मृतांच्या संख्येत आणखीन भर पडली. कंपनीने आरडी 350 साठी याकाळी प्रामुख्याने रॉयल एनफिल्ड बुलेट 350 वर प्रतिस्पर्धी म्हणून लक्ष्य केले होते, जी त्यावेळी भारतातील सर्वात मोठ्या क्षमतेची मोटरसायकल होती त्याचप्रमाणे येझडी रोडकिंग 250 ही आणखी एक प्रतिस्पर्धी होती परंतु , भारतीय बाजारपेठेत इंधन कार्यक्षमता तुलनेत आरडी 350 मागासलेली असल्याने तिला व्यावसायिक यश कमी होते. उच्च खरेदी किंमत, महागडे सुटे भाग, कर्मचार्‍यांची कमतरता या सर्वांमुळे आरडीची विक्री अजूनच थंडावली; आणि याचवेळी नव्याने लाँच झालेल्या सर्वपरिचित आरएक्स 100 ने बाजारात वर्चस्व बनविणे सुरू केले. आजही रस्त्याने चालताना आरडी 350 आपल्या अनोख्या रुबाबाने व आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेते. आरडी 350 ची प्रारंभिक किंमत होती 18000/- रुपये (एक्स शोरूम) #rd350 #yamaha #yamahard350 #bike #motorcycle #2stroke #rajdoot350 #motomagindia #motomagmarathi

10/4/2019, 3:58:00 AM

रेनो मोटर्सने क्विड फेसलिफ्ट लाँच केली आहे. ही कार पाच प्रकारात विक्रीस उपलब्ध आहे, ज्यात दोन पेट्रोल इंजिन पर्याय आहेत.  बुकिंग कंपनीच्या संकेतस्थळावर 5 हजार रुपयांवर ऑनलाईनही सुरू करण्यात आले आहे. भारताबाहेर , चीनमध्ये अलीकडेच बाजारात दाखल करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कार्स पासून मोठ्या प्रमाणात स्टाईलिंगचे सारखेपण क्विडने घेतले आहेत.  नुकत्याच लॉन्च झालेल्या एमजी हेक्टर आणि टाटा हॅरियर एसयूव्हीसारखे स्प्लिट हेडलॅम्प सेटअप नवीन क्विडला प्राप्त झाले आहेत. आमच्या मते नवीन क्विड भारतीय बाजारात नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असे वाटते. प्रारंभिक किंमत आहे  2.81 लाख रुपये. (एक्स शोरूम) #renaultkwid #renault #india #motomagindia #motomagmarathi #carsofindia #carsofinstagram #marathi #maharashtra

10/1/2019, 6:28:58 PM

मारुती सुझुकी एस-प्रेसो आज म्हणजे 30 सप्टेंबर, 2019 रोजी भारतात लॉन्च झाली आहे. मारुती या कारला हॅचबॅकऐवजी मिनी एसयूव्ही म्हणत आहे; मारुती सुझुकी इंडियाची ही नवीन छोटी कार "फ्यूचर-एस कॉन्सेप्ट" कारवर आधारित आहे, जी दिल्लीत ऑटो एक्सपो 2018 मध्ये प्रदर्शित केली होती. नवीन मारुती सुझुकी एस-प्रेसो सहा रंगांच्या पर्यायांमध्ये देण्यात आली आहे, ज्यात सॉलीड सिझल ऑरेंज, पर्ल स्टेरी ब्लू, सुपीरियर व्हाइट, सॉलिड फायर रेड, मेटलिक ग्रॅनाइट ग्रे आणि मेटलिक सिल्वर यांचा समावेश आहे. एस-प्रेसो चार प्रमुख प्रकारांमध्ये विकली जाईल : स्टँडर्ड, एलएक्सआय, व्हीएक्सआय, व व्हीएक्सआय +, आणि पर्यायी ट्रिम आणि ट्रान्समिशन निवडीवर आधारित 10 पुनरावृत्तीमध्ये ती उपलब्ध होईल. एस-प्रेसो हार्टएक्ट (HEARTECT) प्लॅटफॉर्मच्या बेसवर तयार केली गेली आहे, जे भारतीय बाजारासाठी अनुकूलित केले गेले आहे. एस-प्रेसोला नवीन डिझाइन केलेले डॅशबोर्ड प्राप्त झाले आहे, म्युझिक सिस्टीम तथा इन्फोटेनमेंट क्षेत्रासाठी अनोखे रंग वापरण्यात आले आहेत, यामध्ये अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोची ऑफर देणारी स्मार्ट-प्ले स्टुडिओ सिस्टम असून 7 इंचाची टचस्क्रीन जोडली गेली आहे. इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील मध्यभागी स्थित आहे, जे डिजिटल आहे. सोबतच एअर-कॉन सिस्टम आणि यूएसबी आणि 12 व्ही चार्जिंग सॉकेटचा सेट ऑडिओ नियंत्रणे आणि मोबाईल नियंत्रणे सुद्धा त्यातच आहेत. या कार मध्ये केवळ ओआरव्हीएमसाठी (आरसे) मॅन्युअल नियंत्रणे मिळतात, परंतु फ्रंट पॉवर विंडोज आणि पॉवर स्टीयरिंग हे पॅकेजचा एक भाग असण्याची शक्यता आहे, मागील प्रवाशांना काच खाली घेण्यासाठी लीव्हर वापरावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने एस-प्रेसओल ड्युअल फ्रंट एअरबॅग मिळतात. 5 आसनक्षमता असलेल्या नवीन मारुती सुझुकी एस-प्रेसोची किंमत भारतात 3.69 लाख रुपये ते 4.91 लाख रुपये आहे. (एक्स-शोरूम, दिल्ली). #marutisuzuki #spresso #carblog #motomagindia #cars #carsofindia #motomagmarathi

9/30/2019, 7:02:33 PM

अ‍ॅस्टन मार्टिनची डीबीएक्स पहिली एसयूव्ही जी 4.0-लिटर ट्विन-टर्बो व्ही -8 इंजिनने समाविष्ट असून 550 एचपी आणि 516 एलबी-फूट टॉर्क तयार करते. #astonmartin #dbx #cars #carsofinstagram #car #astonmartinDBX #suv #motomagindia #motomagmarathi

9/27/2019, 3:39:16 PM

जुलैमध्ये लाँच केली गेली तेव्हा महिंद्रा एक्सयूव्ही 300 ची एएमटी ट्रिम फक्त डिझेल डब्ल्यू 8 आणि डब्ल्यू 8 (ओ) मॉडेल मध्ये उपलब्ध होती, आता महिंद्राने हे एएमटी(Automatic) गिअरबॉक्स डब्ल्यू 6 व्हेरिएंटमध्ये सादर केले आहेत. हा ऑटो गिअरबॉक्स-सेट इटालियन ऑटोमोटिव्ह कंपनी "मरेलीचा" आहे. सहा-स्पीड गियरबॉक्स एएमटी युनिट 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिनसह इलेक्ट्रॉनिक व्हेरिएबल टर्बोचार्जरसह जोडलेले आह जे 115bhp ची ताकद आणि 300Nm चा टॉर्क जनरेट करते. महिंद्राने जाहीर केले आहे की नवीन डब्ल्यू 6 एएमटी प्रकार आता संपूर्ण भारतभरातील सर्व अधिकृत डीलरशिपद्वारे उपलब्ध होणार आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीची ही पुनरावृत्ती भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी विटारा ब्रेझा आणि टाटा नेक्सनच्या डिझेल एएमटी व्हेरिएंटशी स्पर्धा करत करेल . एक्सयूव्ही 300 ची प्रारंभिक किंमत आहे 9.99 लाख रुपये. #mahindra #cars #carsofindia #mahindraxuv300 #car #india #motomagindia #motomagmarathi

9/27/2019, 5:19:58 AM

बहुचर्चित टाटा अल्ट्रोज चे लॉन्चिंग लांबले...! या महिन्याच्या अखेरीस अल्ट्रोज लाँच होणार असल्याचे टाटा कडून संकेत होते परंतु हे लॉन्चिंग लांबले आहे. 2020 च्या सुरुवातीस या कारचे लॉन्चिंग होईल असे आमच्या सुत्रांनी सांगितले आहे. #tata #tataaltroz #motomagindia #cars #carsofinstagram #india #motomagmarathi

9/26/2019, 4:28:16 PM

आपले YouTube चॅनेल फॉलो करण्यासाठी लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा 🙏 #motorcycle #bikes #marathi #automobile #YouTube #motomagindia #motomagmarathi

9/26/2019, 12:11:07 PM

बजाज ऑटो यंदाच्या दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात त्यांच्या जवळपास सर्व मॉडेल्सवर रोख डिस्काउंट देत आहे, बजाज डोमिनर 400 वर सर्वाधिक रुपये 6000/- ची सूट मिळणार आहे. या व्यतिरिक्त, बजाजने आपल्या सर्व मॉडेल्सवर 1,200/- रुपये किंमतीची विनामूल्य पंचवार्षिक वॉरंटी आणि दोन सर्विस देखील देत आहे. #bajaj #twowheeler #motorcycle #india #motomagindia #bikes #automobile #motomagmarathi

9/26/2019, 6:27:16 AM

MG हेक्टर साठी 1 ऑक्टोबर पासून नव्याने बुकिंग घेणे सुरू केले जाणार आहे... #mg #mghector #india #automobile #cars #carsofinstagram #car #motomagindia #motomagmarathi

9/25/2019, 4:50:14 PM

स्कोडा कोडियाक आणि सुपर्ब (डीएसजी) कॉर्पोरेट एडीशन लाँच झाले आहेत. त्यांच्या प्रारंभिक किंमती अनुक्रमे रु. 25.99 लाख आणि 32.99 लाख अश्या आहेत. स्कोडा कोडियाक आणि सुपर्बच्या कॉर्पोरेट एडीशन किंमतीत रु. 2.37 लाख आणि रु. 1.80 लाख ईतका डिस्काउंट दिला जाणार आहे. विद्यमान स्कोडा मालकांव्यतिरिक्त, आता नियमित ग्राहकदेखील या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. #skoda #skodasuperb #cars #carsofinstagram #india #carblog #maharashtra #skodakodiaq #motomagindia #motomagmarathi

9/23/2019, 5:29:07 PM

पुणे मोटर शो 2019 : बाईक स्टंट शो #punemotorshow2019 #bikes #stuntshow #india #motomagindia #motomagmarathi

9/23/2019, 8:02:01 AM

पुणे मोटर शो 2019 : बाईक स्टंट शो #punemotorshow2019 #bikes #stuntshow #india #motomagindia #motomagmarathi

9/23/2019, 8:01:04 AM